शेतकऱ्याने रक्ताने लिहिले मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer write letter by blood to CM eknath Shinde

शेतकऱ्याने रक्ताने लिहिले मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

हिंगोली : अतिवृष्टीच्या मदतीपासून काही महसूल मंडळे वगळल्याने ताकतोडा (ता. सेनगाव) येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून कैफियत मांडली आहे. अतिवृष्टी झाली नसल्याचे सांगत गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव, पुसेगाव (ता. सेनगाव) या मंडळातील शेतकऱ्यांना मदतीपासून वगळले आहे.

त्यामुळे नामदेव पतंगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अतिवृष्टीसह विविध कारणांनी शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच मदतीपासून वगळल्यामुळे चार मंडळांतील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये, असा प्रश्न ते विचारत आहेत. खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना नाकीनाऊ आणीत असून जगायचे कसे ते सांगा, असा प्रश्न या पत्रात उपस्थित केला आहे. सेनगावच्या तहसील कार्यालयामार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.

Web Title: Farmer Write Letter By Blood To Cm Eknath Shinde Heavy Rain Damage Village Regarding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..