
Farmers Protest
Sakal
धनंजय शेटे
भूम : राज्य सरकार दलाली करतय लागलं की काय असा आम्हाला वाटायला लागले आता .अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून पंधरा रुपये कपात करायचे आणि त्याचे पाच रुपये खर्च करायचे दहा रुपये स्वतःकडे ठेवायचे याला दलाली म्हणायचे नाही तर काय म्हणायचे असे स्वाभिमानी शेतकरी चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी भूम येथे चालू असलेल्या कर्जमाफीच्या आमरण उपोषण ठिकाणी भेट देताना बोलत होते.