Degloor News : देगलूर तालुक्यात वादळीवारयासह पाऊस; शिळवणी येथे विज पडुन बैल ठार
Lightning Strike : देगलुर तालुक्यातील शिळवणी येथील शेतकरी महेबुब शादुलसान जलाल यांच्या शेतातील बैलावर गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसात वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला.
देगलुर : विजेच्या कडकडाटासह गुरूवारी ता. १० रोजी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील शिळवणी येथील शेतकरी महेबुब शादुलसान जलाल यांच्या शेतातील बांधलेल्या बैलावर वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.