
धाराशिव : धाराशिवचे तत्कालिन जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिकेचे विद्यमान आयुक्त सचिन ओंबासे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. धाराशिवमधील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने (मिनिस्ट्री ऑफ पर्सनल ग्रेव्हिनेन्सेस अॅण्ड पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅण्ड ट्रेनिंग- डीओपीटी) महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन ओंबासे यांच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मुळापासून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.