

A Nine-Year Delay: Uday Samant Questions the Stagnation of Kannad MIDC
Sakal
कन्नड : "कन्नडमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१७ मध्येच घेतला होता. मात्र, २०१७ ते २०२६ या नऊ वर्षांच्या काळात ही एमआयडीसी का होऊ शकली नाही? याचे खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कन्नडसाठी एमआयडीसी हवी असेल, तर शेतकऱ्यांना सरकारी बाजारभावाने जमिनी देण्यास राजी करा, एमआयडीसी देण्याची जबाबदारी माझी," असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.