UPSC Success Story : शेतकऱ्याच्या मुलीचा यूपीएससी परीक्षेत झेंडा; नरवटवाडीच्या संपदा वांगेने मिळवला देशात ८३९ वा रँक
UPSC Result 2025 : रेणापूर तालुक्यातील नरवटवाडी सारख्या छोट्या गावातून संपदा वांगेने यूपीएससीत देशात ८३९ वा क्रमांक मिळवत मोठे यश मिळवले. शेतकरी व शिक्षिका आईवडिलांच्या पाठबळाने तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे.
लातूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कठीण असणाऱ्या परीक्षेत (युपीएससी) पहिल्याच प्रयत्नात एका शेतकऱ्याच्या मुलीने देशात ८३९ वा रँक मिळवला आहे. नरवटवाडी (ता. रेणापूर) या खेडेगावातून पुढे आलेल्या संपदा धर्मराज वांगे असे या यशस्वी युवतीचे नाव आहे.