Crop Damage: पंचनामेच होत नाहीत, तर मदत कशी मिळेल? गोकुळवाडी, बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांचा कृषिमंत्र्यांना सवाल
Dattatray Bharane: गोकुळवाडी व बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांचे पिक नुकसान पंचनाम्याशिवाय मदत मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानीची पाहणी करून दिवाळीपूर्वी मदत खात्यात पाठवण्याचे आश्वासन दिले.
बदनापूर : तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांची दाणादाण उडाली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाही.