Cotton
बीड - अगोदरच अतिवृष्टीने खरीप पिकांचे होत्याचे नव्हते केले. त्यात कष्टाने हाती आलेला कापूस आता कमी दराने व्यापाऱ्यांच्या झोळीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा साधारण २५ लाख क्विंटल कपाशीचे उत्पादन झाले. पण, सरकारच्या हमीभाव खरेदी केंद्रांची वानवा असल्याने शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल सुमारे दीड हजार रुपये नुकसान होत आहे.