free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Agriculture department mismanagement in seed distribution scheme: कृषी विभागाच्या गोंधळलेल्या नियोजनामुळे मोफत बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ३०-३५ किमीचा त्रासदायक प्रवास; जवळ केंद्रे असतानाही दूरवर पाठविल्याने संतापाची लाट
Poor Planning in Seed Distribution Sparks Anger Among Farmers in Nilanga

Poor Planning in Seed Distribution Sparks Anger Among Farmers in Nilanga

esakal

Updated on

-राम काळगे

निलंगा : खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराच्या नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. निलंग्याच्या जवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांना बियाण्यासाठी औराद शहाजानी येथे पाठवले जात आहे, तर औराद शहाजानी येथील शेतकऱ्यांना निलंगा येथे जाऊन बियाणे घेण्याचे आदेश दिले जात असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. शिवाय कासारबालकुंदा येथील शेतकऱ्यांना निटूर तर पानचिंचोलीच्या शेतकऱ्यांना औरादशहाजानीवरून बियाणे आणावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून छे.. छे.. हे कसले मोफत बियाणे आशा संतापजनक प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com