esakal | हिंगोलीत सोयाबीनला मिळाला ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली - बाजार समितीच्या मोढ्यात विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनला  ११ हजार २१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले असुन असाच भाल कायम राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

हिंगोलीत सोयाबीनला मिळाला ११ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील या वर्षी अडीच हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड (Soybean Sowing) झाली आहे. अबक पेरणी केलेल्या शेतकऱ्याच्या सोयाबीनची काढणी झाल्याने गुरुवारी (ता.नऊ) हिंगोली (Hingoli) येथील बाजार समितीच्या मोढ्यात विक्रीसाठी आलेल्या सोयाबीनला ११ हजार २१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले असुन असाच भाल कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख २५ हजार ५२३ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अडीच हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अबक पेरणी केली. त्यांचे सोयाबीन काढणीस आले आहे. हिंगोली तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन एकाबेकर यांनी तीन क्विंटल सोयाबीन विक्रीस आणले होते. त्यांच्या सोयाबीनचे बीट ११ हजार २१ रुपये प्रमाणे झाले.

हेही वाचा: 'महाराष्ट्रातील विघ्न दूर करण्यासाठी सामर्थ्य दे'

व्यंकटेश ट्रेडिंग कंपनीने ही बोली लावली होती. दरम्यान, सोयाबीन पहिल्यांदाच बाजार समितीमध्ये विक्रीस आल्याने व भाव देखील चांगला मिळाल्याने या शेतकऱ्याचा सत्कार देखील करण्यात आला. सोयाबीन मालास विक्रमी भाव मिळाल्यामुळे सध्या शेतकऱ्या समाधान व्यक्त केले जात असून असाच भाव हिंगोलीसह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळावा. अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या तेलाचे भावात मोठी वाढ झाली आहे. सणासुदीला झालेली तेलाची भाववाढ सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. दरम्यान, सोयाबीनची मागणी वाढणार असून भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत. अबक लागवडीचे सोयाबीन कापणीला आले असून बाजार समितीत त्याची आवख होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यात उत्साहाचे वातावरण आहे. परंतू यापुढेही सोयाबीनचा भाव असाच टिकून राहते की आवक वाढली की व्यापारी भाव पाडतात असे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, गुरुवारी सोयाबीनला मिळालेल्या भावाची जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू आहे.

loading image
go to top