
लातूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गासाठी सर्वत्र विरोध होत असताना चिंचोली बल्लाळनाथ (ता. लातूर) येथे शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या महामार्गासाठी सोमवारी (ता. २८) पूजन करीत जमीन मोजणी करण्यात आली. तालुक्यातील काटगाव, बोपला या गावातील काही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला होता. त्या पाठोपाठ या गावातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जमीन मोजणीची प्रक्रिया होऊ शकली.