
Nashik Heavy Rain Damage
esakal
हिंगोली : ‘‘होतं नव्हतं ते सगळं पेरणीत घातलं. कर्जबी उचललंय. वाटलं होतं यंदा सोयाबीन, कापसावर कर्ज फेडू, पण बघा की चार वेळा आमच्या शेतात अतिवृष्टी झाली. काय राहील ते तुमीच बघा, अन आम्हाला जगण्यासाठी काही तरी द्या़’’, असे म्हणत पारडा (जि. हिंगोली) येथील शेतकऱ्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमोर व्यथा मांडत टाहो फोडला.