esakal | सेलू तालुक्यातील शेतकरी खरिप हंगामासाठी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज

सेलू तालुक्यातील शेतकरी खरिप हंगामासाठी सज्ज

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : उन्हाळ्यात शेती मशागतीची कामे पूर्ण करुन खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार खरिपातील मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, तूर या नगदी आदी पिकांवर आहे.

तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असून केवळ अठरा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. उर्वरित क्षेत्र कोरडवाहू असल्याने पावसावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. गतवर्षी ऑक्टोंबर महिण्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन आणि कापसाच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. यंदा खरिपाची पेरणी करण्यासाठी तूर, मूगाचे बियाणे शेतकरी वर्गाने खरेदी केले आहेत. यंदाही कापसाचे सर्वाधिक क्षेत्र राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - जाणून घ्या सरकारने खतांसाठी जाहीर केलेले अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवीन दर याविषयी.

दरवर्षी कापसाची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली जाते. यंदा २९ हजार हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७५ हजार कापसाची पाकिटे लागणार आहेत. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करुनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी जमिनीत पुरेशी ओल असावी. ५० ते ६० मीमी पाऊस झाल्यावरच पेरणी करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा दहा टक्के वापर कमी करुन गावात कापसाचे एकाच वाणाचे प्राधान्याने बियाणे वापरावे. मान्सून केरळात दाखल झाला आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस बरसला तर जून महिन्यात वेळेवर पेरणी होऊ शकते. त्यामुळे खरिपातील पिकांचे चांगले उत्पन्न शेतकरी काढू शकतो. विशेष म्हणजे पेरणी वेळेवर झाली तर मुगाचे उत्पन्न चांगले होते. त्यामुळे वेळेवर मान्सूनचा पाऊस होईल अशी अपेक्षा आहे.

गतवर्षी बोगस सोयाबीन बियाणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.यावर्षी तीच परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावू नये यासाठी कृषी विभागाने स्थापन केलेल्या पथकांमार्फत कृषी दुकानांची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांतुन बोलले जात आहे.

loading image
go to top