खतांचे वाढीव दर रद्द केल्यानंतर कोणते खत किती रुपयांना मिळणार, जाणून घ्या सविस्तर

खतांचे वाढील दर रद्द झाल्यानंतर खतांच्या नवीन दराविषयी माहिती
fertilizer
fertilizerGoogle

आता सरकारने डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच पी अँड के (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहेत.

सोलापूर : कोरोना (Covid-19) विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) शेतकरी पिचला जात आहे. त्याच्या शेती उत्पादनाला बाजारभाव मिळत नाही. त्यातच पावसाळ्यात नवीन पीक लागवड करताना लागणाऱ्या खते व बी-बियाणे (Fertilizers and seeds) विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. यात शेतकरी मात्र भरडला जात होता. (Information on new fertilizer rates after cancellation of increased rates)

fertilizer
आरक्षणामुळे "एमपीएससी'च्या 24 परीक्षांचा तिढा ! संयुक्‍त पूर्वपरीक्षा लांबणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीएपी खतांवरील अनुदानात वाढ केल्याचे जाहीर केले होते, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मग फक्त डीएपीचेच दर कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते. पण आता सरकारने डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच पी अँड के (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहेत. जाणून घ्या सरकारने खतांसाठी जाहीर केलेले अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवीन दर याविषयी.

खतांवरील अनुदानात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचे अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवले. यामुळे सगळ्याच कंपन्यांची डीएपी खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय 20 मे रोजी केंद्रीय खते मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले. त्यानुसार फॉस्फेट आणि पोटॅश खतांसाठी (पी अँड के) (P & K fertilizer) सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सबसिडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता खतांमध्ये जी दरवाढ झाली होती ती कमी होणार आहे. केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. म्हणजेच खतांमधील पोषक द्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार ही सबसिडी दिली जाते.

2020-21 मध्ये नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 14.888 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्‍चित करण्यात आले होते. आता 2021-22 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजनसाठी प्रतिकिलो 18.789 रुपये, फॉस्फेटसाठी प्रतिकिलो 45.32 रुपये, पोटॅशियमसाठी प्रतिकिलो 10.116 रुपये, तर सल्फरसाठी प्रतिकिलो 2.374 रुपये अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फॉस्फेटसाठीचे अनुदान 14.888 रुपयांहून 45.32 रुपये करण्यात आले आहे.

fertilizer
जिल्ह्यात तीन हजार रेमडेसिव्हिर पडूनच ! साडेसतरा हजार बेड शिल्लक

खतांचे नवीन दर

भारतात सर्वाधिक वापर युरिया या खताचा केला जातो. यंदा युरियाचे दर "जैसे थे' ठेवण्यात आले होते. यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजेच सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची युरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळणार आहे.

आता आपण कंपनीनुसार खतांच्या इतर ग्रेड्‌सच्या किमती जाणून घेऊया.

इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) ने नवीन खतांचे दर जाहीर केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार 20 मे 2021 पासून या नवीन दराने खतांची विक्री केली जाणार आहे.

इफ्को कंपनीच्या नवीन खतांचे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • DAP 18-46-00 - (1200)

  • NPK 10-26-26 - (1175)

  • NPK 12-32-16 - (1185)

  • NPS 20-20-0-13 - (975)

याशिवाय कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात असंही म्हटलंय, की बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एमआरपीच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील. म्हणजे सध्या बाजारात इफ्कोची NPK 10-26-26 ची एक बॅग 1775 रुपयांना उपलब्ध आहे, ती आता इथून पुढे 1175 रुपयांना विकली जाईल.

fertilizer
चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या प्राध्यापकाने केली शरद पवारांवर पीएचडी !

ADVENTZ ग्रुपअंतर्गत येणाऱ्या झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड (जय किसान या ब्रॅंड नावाने खत विक्री), मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड (जय किसान मंगला या ब्रॅंड नावाने खत विक्री) आणि प्रदीप फॉस्फेट्‌स लिमिटेड (जय किसान नवरत्न या ब्रॅंड नावाने खत विक्री) या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे नवीन दर जारी केले आहेत. हे नवीन दर 20 मे 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. तसेच या कंपन्यांनी जारी केलेल्या पत्रकात असेसुद्धा स्पष्ट केले आहे की, या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एमआरपीच्या छापील बॅगासुद्धा नवीन दराने विकण्यात येतील.

जय किसानच्या खतांचे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • DAP 18-46-00 : (1200)

  • NPK 10-26-26 : (1375)

  • NPK 12-32-16 : (1310)

  • NPK 19-19-19 : (1575)

  • NPS 20-20-0-13 : (1090)

  • NP 28-28-0 : (1475)

  • NPK 14-35-14 : (1365)

कोरोमंडल ही खत उत्पादक कंपनी ग्रोमोर या ब्रॅंड नावानं खताची विक्री करते. कंपनीने 20 मे 2021 पासून नवीन दर लागू केले आहेत. जुना स्टॉक किंवा खताचे पोते ज्यावर जास्तीची म्हणजेच दरवाढ झाली तेव्हाची एमआरपी असेल तोसुद्धा या नवीन दरानेच विकावा, असेही सांगितले आहे.

कोरोमंडलच्या खतांचे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • DAP 18-46-00 : (1200)

  • NPS 20-20-0-13 : (1050)

  • NPS 16-20-0-13 : (1000)

  • NPK 14-35-14 : (1400)

  • NPK 10-26-26 : (1300)

  • NP 28-28-0-0 : (1450)

  • NPS 24-24-0-8 : (1500)

  • NPKS 15-15-15-09 : (1150)

स्मार्टकेम टेक्‍नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी "महाधन' या ब्रॅंडखाली खंतांची विक्री करते. 20 मेपासून खतांची नवीन दराने विक्री होणार आहे.

महाधनच्या खतांचे नवे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • 24-24-00 : (1450)

  • 10-26-26 : (1390)

  • 12-32-16 : (1370)

  • 20-20-0-13 : (1150)

  • 14-28-00 : (1280)

"गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल लिमिटेड' ही कंपनी "सरदार' या ब्रॅंडच्या नावाने खतांची विक्री करते. या कंपनीने सुद्धा त्यांच्या खतांचे नवीन दर जाहीर केले आहेत.

सरदारच्या खतांचे नवे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • सरदार अमोनियम सल्फेट : 735

  • सरदार DAP : 1200

  • सरदार NPK 10-26-26 : 1175

  • सरदार NPK 12-32-16 : 1185

  • सरदार APS : 975

इंडियन पोटॅश लिमिटेड ही कंपनी बाजारात "आयपीएल' या ब्रॅंडच्या नावाने खतांची विक्री करते. या कंपनीने त्यांचे सुधारित दर जाहीर केले आहेत.

आयपीएलचे नवे दर

खतांचा ग्रेड - 2021 साठीचे नवे दर (रुपये)

  • MOP : 1000

  • DAP : 1200

  • 16-16-16 : 1125

  • 20-20-0-13 : 1050

विक्रेत्याने ज्यादा दर घेतल्यास येथे करा तक्रार

जर तुम्हाला तुमच्या भागात एखादा विक्रेता पूर्वीच्या ज्यादा दरानेच खत विकत असेल तर तुम्ही फोनद्वारे यासंबंधीची तक्रार करू शकता. त्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. याविषयी माहिती देताना कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी असलेल्या निर्बंध काळात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याच्या निवारणासाठी नियंत्रण दिलेल्या निर्देशानुसार कृषी आयुक्तालय स्तरवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाला आहे. त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 तसेच कृषी विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com