esakal | शेतकऱ्यांनी कसं जगायचं; दिव्यांग शेतकरी घुगे यांचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी

शेतकऱ्यांनी कसं जगायचं; दिव्यांग शेतकरी घुगे यांचा प्रश्न

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : मागील वर्षाच्या अतिवृष्टीत हाती आलेली पिके वाया गेली,यावर्षीही अति पावसामुळे दोनवेळा पिकांची बरीच नासाडी झाली त्यातून वाचलेली पिके कालच्या अतिवृष्टीने पाण्याखाली गेली.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी गुराढोरांचं जितराब कसं जगवायचं, मुलांच्या शिक्षणाचा, लेकीबाळींचे कर्तव्य,कर्जाची परतफेड,शिवाय प्रापंचिक समस्या आहेतच अशा अनेक प्रश्नांच्या कोंडीत सापडलेल्या सुनील सदाशिव घुगे या दिव्यांग तरूण शेतकऱ्याने गोरख आघाव या शेतकऱ्यांसमोर भावनिक होऊन आपली व्यथा मांडत शेतकऱ्यांनी कसं जगायचं सांगा ना असा प्रश्न उपस्थित केला.

तालुक्यातील केला येथील दिव्यांग शेतकरी सुनील सदाशिवराव घुगे यांना वीस एकर शेती असून ते स्वतः शेती व्यवसाय करतात.यावर्षी त्यांनी दहा एकर क्षेत्रात सोयाबीनच्या दहा बॅग बियाणाची लागवड केली. उर्वरित क्षेत्रात कापूस, तूर व इतर पिके घेतली. असून याअगोदर झालेल्या अति पावसामुळे दोनवेळा त्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला.त्यातून वाचलेली पिके चांगली बहरून हाती येण्याच्या स्थितीत असताना कालच्या पावसामुळे घुगे यांच्या संकटात आणखी भर पडल्याने ते चिंतीत झाले आहेत.

हेही वाचा: निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार, निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका

गुरुवारी (ता.२३) तालुक्यात अति पाऊस झाला.यावेळी केहाळ शिवारातील परिसरात तीन तास रेकार्ड ब्रेक झालेल्या मुसळधार पावसात घुगे यांच्या शेतातील सोयाबीन पाण्याखाली गेले इतरही पिकांमध्ये पाणी साचले आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे होण्याची भीती असल्याने ते चिंतीत झाल्याचे दासत आहे.गेल्या वर्षाच्या अतिवृष्टीमध्ये देखील त्यांच्या खरिप पिकांची ९० टक्के नुकसान झाली. परंतु केवळ गावाचा समावेश असलेल्या सावंगी-म्हाळसा मंडळ शासनाच्या निकषानुसार अतिवृषष्टी मधून वगळण्यात आल्याने घुगे यांच्यासह मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या अनुदानापासून वंचित रहावे लागले.

माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह,प्रापंचिक खर्चासह पाल्यांच्या शिक्षाणाचा, शेतीचा खर्च यासह इतर सर्व खर्च पिकोत्पन्नावर अवलंबून आहे.करिता प्रशासनाने झालेल्या पिक नुकसानीचा पंचनामा करून शासनाने यावर्षीतरी नुकसानभरपाई द्यावी अशी अपेक्षा दिव्यांग शेतकरी सुनील घुगे यांनी व्यक्त केली.

loading image
go to top