बदनापूर - महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असा शब्द दिला होता. मात्र सत्तेवर येऊन तीन महिने झाले तरी अद्याप कर्जमाफी बाबत कुठलाच निर्णय घेतला नाही. तेव्हा कर्जमाफी मिळत नाही, तो पर्यंत आम्ही बदनापूर तहसील कार्यालयातील झाडांवर ठिय्या मांडू, अशी भूमिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या आवारातील झाडांवर बसून शुक्रवारी (ता. सात) सकाळी आठ वाजेपासून अनोखे हनुमान आंदोलन सुरू करण्यात आले आहे.