कळंब - शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ या सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर (उ.बा.ठा) शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी घणाघाती हल्ला चढवला असून आमदार पाटील यांच्या म्हणण्यानुसार कर्जमाफी हा नाद नाही, ही शेतकऱ्यांची गरज आहे..सलग पावसाने, अतिवृष्टीने आणि बाजारातील घसरणीने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर असे वक्तव्य म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.मोठ्या घोषणानी शेतकरी बुचकूळ्यात पडला आहे. शासनाने कर्ज माफी न करता, केवळ आश्वानाचे गाजर दाखवील आहे. दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी केलेल्या ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नसून, आत्मसन्मानावर थेट आघात करणारे आणि सत्तेचा माज दाखवणारे आहे, असा घणाघाती हल्लाबोल आमदार पाटील यांनी केला..गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्च वाढ, आणि बाजारातील भाव घसरण यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. अशा वेळी शासनाने मदत करायची सोडून 'कर्जमाफीचा नाद' अशी भाषा वापरणं, हे ग्रामीण जनतेचा अपमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आलं आहे..शेतकरी घाम गाळून देशाचे पोट भरणारा शेतकरी आज अतिवृष्टी, दुष्काळ आणि वाढत्या खर्चांमुळे कर्ज घेतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि औषधांसाठी कर्ज घेणाऱ्याला नाद लागला म्हणणे म्हणजे त्याच्या वेदनेचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला..शेतकरी भीक मागत नसून, आपल्या घामाच्या आणि श्रमाच्या सन्मानाचा हक्क मागत आहे. सरकारने या अपमानाची दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल.शेतकरी जेव्हा रागावतो, तेव्हा सत्तेच्या खुर्च्या हलतात आणि राजकारणाचे पाया हादरतात, असे खडे बोल त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले..आमदार पाटील पुढे म्हणाले, सत्तेच्या मखमली खुर्चीत बसल्यावर रानातील चिखल दिसत नाही आणि शेतकऱ्याचा आक्रोश ऐकू येत नाही. निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचे आश्वासन देणारे नेते आता सत्तेत येताच त्याच मागणीला ‘नाद’ म्हणतात. उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी करताना संवेदनशीलता जागी होते, पण शेतकऱ्याने हक्क मागितला की त्याला टोचले जाते. हा सत्तेचा अहंकार नसून अन्यायाचा उत्सव आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.