

Baramati Agro Announces First Sugarcane Payment of 3311 Rupees Per Tonne After Farmers Road Protest in Kannad Maharashtra
esakal
कन्नड: ऊसदरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (ता. २२) तालुक्यातील पाणपोई फाटा येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर साडेचार तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अखेर आंदोलनकर्ते आणि बारामती अॅग्रो युनिट-२ कारखाना प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत तोडगा निघाला. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार ३११ रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.