Beed Protest: शोले स्टाइल आंदोलन; आश्वासनानंतर माघार,अखेर निजामकालीन रस्त्याचा प्रश्न तहसीलदारांकडून लागला मार्गी
Beed News: निजामकालीन रस्त्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी केज तालुक्यातील आडस येथील शेतकऱ्यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्याची कारवाई सुरू झाली.
केज : निजामकालीन जुना रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता आडस येथील शेतकऱ्यांनी वाजता पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.