Farmers protest
sakal
मराठवाडा
Beed News: रेन्यू पॉवर कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; पवनचक्की टॉवरचे काम थांबवले, अधिकाऱ्यांना २८ तास ठेवलं जागेवरच!
Farmers protest: अधिकाऱ्यांसाठी खिचडी बनवत शेतकऱ्यांचा आंदोलन पवित्रा; २८ तास थांबलेले अधिकारी आणि तोडगा अद्याप नाही! तारांचे प्रति मिटर २२ हजार रुपयेप्रमाणे, तर पवनचक्कीच्या प्रती टॉवर १७ लाख रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली
वाशी: रेन्यू पाॅवर कंपनीच्या पवनचक्कीच्या तुटलेल्या टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यास विरोध करीत बुधवारी (ता.१५) दुपारी तीनपासून ते गुरुवारी (ता.१६) सायंकाळी सातपर्यंत म्हणजेच तब्बल २८ तास वाहनासह एकाच जागेवर शेतकऱ्यांनी थांबविल्याचा प्रकार सारोळा (मां ) येथे घडला.

