

From Farm Fields to Research Labs: Hanumant Gambhire’s Doctorate Journey
Sakal
कळंब : कठोर परिश्रम, जिद्द आणि अपार चिकाटीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील एका होतकरू तरुणाने औषधनिर्माण क्षेत्रात (फार्मसी) पीएचडी मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे. मर्यादित आर्थिक परिस्थिती, शेतीवरील अवलंबित्व आणि अनेक अडचणींवर मात करत तालुक्यातील इटकूर येथील डॉ. हनुमंत गंभिरे या तरुणाने औषधनिर्माण क्षेत्रात यांनी गगनभरारी घेतली आहे. या संशोधकाची यशकथा प्रेरणादायी असून पंजाब विद्यापीठाने ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान करून त्यांचे नुकतेच कौतुक केले.