MPSC Success Story : शेतकऱ्याच्या मुलाचे ‘एमपीएससी’त यश

तालुक्यातील तडोळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने अत्यंत खडतर परिस्थितीत अभ्यास करून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. आता वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली.
MPSC Success Story
MPSC Success Story sakal

परळी वैजनाथ : तालुक्यातील तडोळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने अत्यंत खडतर परिस्थितीत अभ्यास करून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. आता वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली. तडोळी येथील शेतकरी कुटुंबातील प्रमोद भास्कर सटाले यांच्या घरी खेड्यातल्या माणसांसारखी सर्वसाधारण परिस्थिती, घरात म्हणावे असे कोणाचेच शिक्षण झालेले नाही.

गावातील शाळा चौथीपर्यंत, माध्यमिक शिक्षण घ्यायचे म्हटले तर मांडखेलच्या आसूबाई विद्यालयात रोज पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत मोठ्या जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यापुढे काळेवाडी (रेणापूर) येथे मामाच्या घरी राहून १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांना हातभार लागावा, म्हणून लवकर नोकरी मिळावी, यासाठी एमआयटी लातूरमधून बीबीए पूर्ण केले.

पुढे शिकण्याची इच्छा असल्याने घरच्यांची समजूत काढत पुण्यातून एमबीए पूर्ण करायचे ठरवले. पण, मधल्या काळात आपल्या तीन मुलांना एकाच वेळी शिकविताना शेतकरी बापाने मुलांची स्वप्नं परिस्थितीमुळे अर्धवट राहू नये, म्हणून काही जमीन विकली. तिघांचेही शिक्षण पूर्ण केले. पण, स्वतःचे वेगळेपण सिद्ध करायचे असल्याने स्पर्धा परीक्षा अभ्यासाचा २०१२ पासून एक प्रवास सुरू केला, पण मार्ग दाखविणारे कोणी नसल्याने मध्येच यूपीएससीचा अभ्यास केला.

MPSC Success Story
MPSC Exam : एमपीएससीने एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

ज्युनिअर ऑडिटर म्हणून नोकरी लागली. कालांतराने नोकरीचा राजीनामा देत नंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. २०१४-१५ मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) परीक्षा पास झाले. ही परीक्षा पास झाल्याने आयुष्यात काहीशी स्थिरता आली.

जमीन विकली

प्रमोद सटाले यांच्या वडीलांना १० एकर शेती होती. पण, मुलांच्या शिक्षणासाठी ७ एकर जमीन विकावी लागली. प्रमोदला दोघे भाऊ असून, एक वकील तर एक राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com