esakal | कयाधूच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी केली उन्हाळी पिकांची पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

कयाधू नदीतील पाणी

कयाधूच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी केली उन्हाळी पिकांची पेरणी

sakal_logo
By
सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पात्रता जमा झालेल्या मुबलक पाण्यावर परिसरातील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची पेरणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

डोंगरगाव पूल येथून वाहणाऱ्या कयाधू नदी पात्रात असलेल्या सायफनमार्ग ईसापुर धरणातून उजव्या कालव्याला सुटलेले पाणी कयाधू नदी पात्रात जमा झाले आहे. गावापासून दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत हे पाणी जमा झाले आहे. या जमा झालेल्या मुबलक पाण्यावर नदी काठावरील विस ते पंचवीस शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी पिकाची पेरणी केली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संचारबंदीचे आदेश काढले होते.

ज्यामध्ये भुईमूग, टाळकी ज्वारी, भाजीपाला, टरबूज आदी पिके नदीतून सिंचन वाहिन्या टाकून त्या पाण्यावर उन्हाळी पिके घेतली आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून या पाण्याचा लाभ शेतकरी घेतात.उन्हाळी पिकाबरोबरच जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील या पाण्यामुळे सुटतो व ठीक ठिकाणी जनावराना पाणी मिळून त्यांची तहान भागते.

परंतु गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या कोरोना आजाराच्या मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या अनेक पिकांना मोठा फटका बसल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. परंतु शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न उपस्थित राहत असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केलेली आहे. भुईमूग शेंगा विक्रीबरोबरच त्याचा चारा जनावरांना कामी येतो हे ठरवून भुईमूगाबरोबरच उन्हाळी टाळकीही लावण्यात आलेली आहे. यामुळे कयाधु नदीत जमा झालेल्या पाण्याचा परिसरातील शेतकरी पुरेपूर वापर करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे