वसमत - शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेले अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा पवित्रा घेत सामुहिक आत्महत्येचा इशारा दिला.