esakal | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भरतेकडे- आमदार राजू नवघरे

बोलून बातमी शोधा

वसमत फोटो
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भरतेकडे- आमदार राजू नवघरे
sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील ४६ गावांची निवड केली असून शेततळे, ठिबक, तुषार सिंचन यासह इतर बाबीसाठी चार हजार ६९३ शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १३.९४ कोटी रुपयाचे अनुदान जमा करण्यात आले असल्याची माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या ४६ गावात ग्राम संजीवनी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये आठ हजार ३७८ शेतकऱ्यांनी आजपर्यंत नोंदणी केली असून २४ हजार ९८४ बाबींसाठी अर्ज केला आहे. त्यापैकी पात्र १० हजार ६२७ बाबींसाठी पूर्वसंमती दिली आहे. चार हजार ६९३ लाभार्थ्यांनी विविध बाबींपैकी १२ सामूहिक शेततळे, एक हजार ३२ ठिबक, एक हजार ६२३ तुषार संच, ९८ फळबाग लागवड, २३८ बिजोत्पादन कार्यक्रम, ९४४ पाईप, ६३४ विद्युत पंप, तीन गांडूळ गट, एक ट्रॅक्टर, एक शेडनेट, नऊ तुती लागवड, दोन हन्ँडेप, सहा मत्स्यपालन, एक सेंद्रिय गट आदी बाबींसाठी १३.९४ कोटीचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा - कळमनुरीत रॅपिड अँटीजन तपासणी न करता व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व आर्थिक प्रगती होऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

विशेष बाब म्हणजे पोकरा योजनेत वसमत तालुका जिल्ह्यात पहिला तर विभागात तिसरा आला आहे. आमदार नवघरे यांनी वेळोवेळी अधिकारी कर्मचारी यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना वेळीच अनुदान उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा केला. तसेच पोखरा योजनेत लाग घेण्यासाठी प्रत्येक गावातील ग्राम संजीवनी समितीला मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली आहे. त्यांनी त्वरित काम पूर्ण करुन बिले सबंधित पोर्टलवर अपलोड करुन संबंधित कृषी सायकास संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व आर्थिक प्रगती होऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचे आमदार नवघरे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे