परळी गंगाखेड रोडवर बस - ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fatal accident of bus-travels on Parli Gangakhed road

परळी गंगाखेड रोडवर बस-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

गंगाखेड - लातूर येथून नागपूरकडे जाणारी बस व नांदेड येथून पुणे कडे जाणारी ट्रॅव्हल्स यांचा गंगाखेड-परळी रोडवरील करम पाटीजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये बस चालकाचा मृत्यू तर प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना (ता.२८) जुलै रोजी रात्री घडली.

नांदेड येथून पुणे कडे जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.२२. ३६१९ गंगाखेड-परळी रोडवर असलेल्या करम पाटील जवळ आली असता या ठिकाणी लातूर येथून नागपूरकडे जाणारी बस क्रमांक एम.एच.२० बी.एल. ४०७४ यांची (ता.२८) जुलै रोजी रात्री १०:२० च्या सुमारास समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये बस चालक हनुमंत नामदेव व्हावळे हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बस व ट्रॅव्हल्स मधील जवळपास २५ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना परळी व गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना परभणी येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले.