बदनापूर - येथील शंकरनगर भागात दोन भावात मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या पैशाच्या वादातून बाप-लेकाची धारदार शस्त्राच्या हल्याने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही अमानुष घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी सख्या भावासह इतर पाच जणांविरुद्ध मंगळवारी सायंकाळी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.