Kannad Accident: जेवण करून परतताना काळाचा घाला! डोळ्यांदेखत पित्याचा मृत्यू; तेरावर्षीय मुलगा गंभीर जखमी, नेमकं काय घडलं..

Tractor Hits Bike Near Nachanvel Farmer Dies Son Battles for Life: नाचनवेलजवळ काळाचा थरार; ट्रॅक्टरच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू, १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
Kannad Accident News Father Killed as Unknown Tractor Hits Bike Near Amadabad Phata 13 Year Old Son Seriously Injured

Kannad Accident News Father Killed as Unknown Tractor Hits Bike Near Amadabad Phata 13 Year Old Son Seriously Injured

sakal

Updated on: 

नाचनवेल : कन्नड तालुक्यातील नाचनवेल चौफुलीवर वडिलांसोबत हॉटेलमध्ये आनंदाने जेवण करून दुचाकीवरून गावाकडे परतणाऱ्या बाप-लेकावर काळाने अचानक घाला घातला. सिल्लोड रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ बुधवारी (ता. २५) रात्री अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात कारभारी हरसिंग बिघोत (राजपूत) (वय ३६) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा यश (वय १३) हा गंभीर जखमी झाला आहे. आपल्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू पाहणाऱ्या चिमुरड्याच्या आक्रोशाने उपस्थितांची मने अक्षरशः हेलावून गेली.

Loading content, please wait...