धक्कादायक! कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे वडिलांनी केली पोटच्या मुलीची हत्या | Maharashtra Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

धक्कादायक! कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे वडिलांनी केली पोटच्या मुलीची हत्या

उस्मानाबाद : कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला असून उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी आईवडिलांना अटक करण्यात आली आहे.

(Father Firing On Daughter Latest Updates)

दरम्यान, काजल मनोज शिंदे असं या मृत मुलीचे नाव असून ती माहेरी राहत असल्याची माहिती आहे. रविवारी काजलच्या आईने मटण बनवलं होतं पण काजलचे दुर्लक्ष झाल्याने कुत्र्याने हे मटण खाल्लं. त्यानंतर काजल आणि तिच्या आईमध्ये वादावादी झाली आणि त्याच रागाच्या भरात मद्यपान केले असलेल्या मनोज शिंदे याने तिच्या छातीवर घरातल्या गावठी बंदुकीने गोळी मारली. त्यानंतर काजलला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधी तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Shashi Tharoor: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत? सोनिया गांधींचाही होकार

या घटनेनंतर आरोपी असलेल्या मनोज शिंदे आणि मृत मुलीच्या आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिक तपास सुरू असल्यातचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर या घटनेमुळे परिसरातील लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Father Firing Murder Daughter Osmanabad Dog Eat Meat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..