बीडहून दुचाकीवर जाताना अपघातात वडील ठार, मुलगा गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

रामराव आलु राठोड (रा. आंबुनाईक तांडा) हे आपल्या मुलासमवेत मोटारसायकलवर रात्रीच्या सुमारास गावाकडे जात होते. गढीच्या पुलावर त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.

गेवराई (जि. बीड) - बीडहून गावाकडे मोटरसायकलवर पिता-पुत्र जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात पिता गंभीर जखमी होऊन ठार झाला तर जखमी अवस्थेत असलेल्या मुलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी (ता. २१) रात्रीच्या दरम्यान गढीच्या पुलावर घडली. 

रामराव आलु राठोड (रा. आंबुनाईक तांडा) हे आपल्या मुलासमवेत मोटारसायकलवर रात्रीच्या सुमारास गावाकडे जात होते. गढीच्या पुलावर त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात रामराव राठोड हे गंभीर जखमी होऊन ठार झाले तर त्यांचा मुलगा अमोल राठोड (वय १६) याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father killed in accident, son critically

Tags
टॉपिकस
Topic Tags: