Kantabai madhe and Dagdu Madhe
sakal
कन्नड - तालुक्यातील कळंकी येथील ठाकरवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. कांताबाई दगडू मधे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. आईचा डोळ्यांदेखत झालेला हा क्रूर अंत पाहून घाबरलेल्या चिमुकल्यांनी गावात धाव घेत आपबिती सांगितली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.