

Father Killed Brutally By Son in Kadethan Village
Sakal
पाचोड : अखेर कडेठाण (ता.पैठण) येथे बापाचा खून करणाऱ्या व्यसनाधिन मोठया मुलांविरुद्ध लहान मुलाच्या तक्रारीवरून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला येऊन त्यास पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी रविवारी (ता.२३) पैठणच्या न्यायलयासमोर उभे केले असता न्यायालयाने मंगळवार (ता.२५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुरुवारी (ता.१३) दारुच्या आहारी गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय रामेश्वर कल्याण काळे (रा.कडेठाण) या पोटच्या मुलाने जन्मदात्या कल्याण बाबुराव काळे (वय ६८) या पित्याचा खून करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. २२) उघडकीस आली होती.यासंबंधी पाचोड पोलिसांनी खूनी मुलास ताब्यात घेतले होते.