esakal | वैद्यकीय महाविद्यालयाची फाईल उद्योगमंत्र्याकडे अडली- फौजिया खान
sakal

बोलून बातमी शोधा

faujiya khan

वैद्यकीय महाविद्यालयाची फाईल उद्योगमंत्र्यांकडे अडली- फौजिया खान

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. परंतू जमीन हस्तांतरणाची फाईल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीमुळे अडकली आहे असा आरोप करीत या स्वाक्षरीसाठी जनआंदोलनाच्या माध्यमातून रेटा लावावा लागणार आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी बुधवारी (ता.एक) दिली.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर व्हावे यासाठी सर्वस्तरावर आंदोलने सुरु आहेत. एकीकडे खासदार फौजिया खान व माजी आमदार विजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली परभणीकर संघर्ष समिती प्रयत्नरत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला आता जनआंदोलनाचे स्वरुप आले आहे. बुधवारी परभणीत युवकांचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी बुधवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया नोंदविली आहे.

हेही वाचा: दहीहंडी फोडणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या प्रतिक्रियेत त्या म्हणतात, परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून परभणीकर संघर्ष करीत आहेत. आतापर्यंत भौतिक सुविधा निर्माण करणे, प्रस्ताव पाठविण्याची कामे करण्यात आली आहेत. तेव्हापासून हे आंदोलन सुरु झाले होते. परंतू आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता शेवटचा रेटा द्यावा लागणार आहे. कॅबिनेट मध्ये सुद्धा फाईल बुक करण्यात आली आहे. ती अर्थ मंत्रालयात गेली आहे. परंतू महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जमीन हस्तांतरणावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी अद्यापही स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. उद्योगमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी आता परभणीतील नेत्यांना लक्ष देऊन ते काम प्राधान्यक्रमाने करावे लागणार आहे असेही खासदार फौजिया खान म्हणाल्या. आता परभणीकरांचे हे जनआंदोलन झाले आहे. हा लढा शेवटचा म्हणून लढावा लागणार आहे असेही त्या म्हणाल्या.

loading image
go to top