बीड - अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे कौटुंबिक वादातून पत्नीनेच दारुड्या पतीचा वायरने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शरीफ पठाण हे नेहमी दारू पिऊन पत्नी नसरीन पठाण यांना त्रास देत असत..घटनेच्या रात्री वाद विकोपाला गेल्याने नसरीन यांनी रागाच्या भरात बीड, ता. ३० अंबाजोगाई काळ्या वायरने शरीफ यांचा गळा आवळून त्यांना जीवे मारले..या कृत्यानंतर नसरीन यांनी पतीला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचला व नातेवाइकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या सतर्कते मुळे हा बनाव उधळला गेला..मृतदेहाच्या गळ्यावरील व्रण पाहून पोलिसां नी चौकशी केली असता नसरीन यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शरीफ यांच्या मुलाच्या तक्रारीवरून आरोपी आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.