हिंगोलीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार; कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार

हिंगोली शहरात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून सकारात्मक रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढुन अत्यावस्थ रुग्णांची संख्यासुध्दा वाढत आहे.
स्वच्छता कर्मचारी सत्कार
स्वच्छता कर्मचारी सत्कार
Updated on

हिंगोली : कोरोना कोवीड-१९ पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील मयत (Hingoli sanitize employee) रुग्णांचे संपुर्ण विधीसह अंत्यसंस्कार करण्याची सेवा देणाऱ्या नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकारी (chief officer) यांच्या हस्ते सोमवार (ता. २४) सत्कार करण्यात आला. या कर्मचाऱ्यांनी कोरोना संसर्गाने (covid) मृत्यू पावलेल्या २७ जणांवर अंत्यसंस्कार केले होते. (Felicitation- of- cleaning- staff -in -Hingoli- Funeral- on corona -patients)

हिंगोली शहरात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून सकारात्मक रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढुन अत्यावस्थ रुग्णांची संख्यासुध्दा वाढत आहे. त्यानूसार शहरामध्ये कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचे मार्गदर्शन व नियंत्रणाखाली नगर परिषद कर्मचाऱ्यांचे पथके नियुक्त करण्यात आले असून यामाध्यमातून शहरामध्ये विविध प्रकारचे बचावात्मक उपाययोजना सुरु आहेत.

जसे की शहरामध्ये हायपोक्लोराईडद्वारे फवारणी करुन निर्जंतुकीकरण करणे, हॉट स्पॉट बॅराकेटींग द्वारे प्रतिबंधीत करणे, कोवीड सेंटरचे, संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे, तेथील दैनंदीन स्वच्छता करणे, त्याठिकाणचा दैनंदीन निर्माण होणारा कचरा डेडीकेटेड वाहनाद्वारे संकलीत करणे, सकारात्मक रूग्णांच्या संपर्कातील नागरीकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करणे, आरोग्य विभागाच्या सहायाने शहरातील नागरीकाव्यापारी यांचे दैनंदीन कोरोना चाचणी करणे, लसीकरण करणे तसेच जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळी निर्गमीत होणाऱ्या आदेशानूसार प्रतिबंधीत व्यवसाय, व्यापार, दुकाने यांच्यावर नियंत्रण ठेवणे, शहरामध्ये सोशल डिस्टसींग कायम ठेवणे, विना मास्क फिरणारे तसेच नियमबाह्य व्यवसाय करणारे यांच्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करणे, शहरातील मुख्य बाजारपेठेत एकाच ठिकाणी नागरीकांची गर्दी होवु नये म्हणुन मुख्य भाजी मंडईचे शहरातील पाच ठिकाणी विकेंद्रीकरण करुन नागरीकांना खरेदी करण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

हेही वाचा - नितीन गडकरींसोबत शेतकऱ्यांची लवकरच बैठक- प्रताप पाटील चिखलीकर

विविध स्वरुपाच्या कारवाया नगरपरिषद मार्फत सुरु आहेत. यामध्ये अतिशय महत्वाची बाब म्हणजे सकारात्मक रुग्ण अत्यावस्थ होवून मयत झाल्यास जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मयत रुग्णाचे मृतदेह आरोग्य विभागमार्फत अंत्यविधी करण्याकरीता नगरपरिषदेकडे सुर्पूत करण्यात येतो. त्यानूसार मयत रुग्णास प्रत्यक्ष ठिकाणावरुन नियोजीत स्मशानभूमीपर्यंत आनण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हस्ते संपुर्ण सुरक्षात्मक साहित्याचा वापर करून करण्यात येतो. मयत रुग्णाचे अंत्यसंस्कार विधी करण्याकरीता नगरपरिषदेमार्फत शहरातील रिसाला बाजार येथील स्मशानभूमीमध्ये संपुर्ण नियोजन करण्यात आले असून मयत रुग्णाचे अंत्यसंस्कार करण्याकरीता स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

त्यानूसार मयत रुग्णाचे अंत्यविधी करण्याच्या अनुषंगाने अग्नीडाग देण्याकरीता मयताचे नातेवाईकास संपुर्ण सुरक्षात्मक साहित्य देवुन पाचारण करण्यात येते, त्यानूसार मयताचे नातेवाईकाने मृतदेहास अग्नीडाग दिल्यानंतर पुढील संपुर्ण क्रिया पार पडेपर्यंत सदर ठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात असतात किंबहुना काही वेळेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये मयत रुग्णांचे नातेवाईक भितीपोटी मयत रुग्णास अग्निडाग देण्यास ईन्कार करतात, अशा वेळी नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी हे कर्त्यव्यापोटी स्वत : मयत रुग्णास अग्निडाग देण्याचे काम करतात, त्याच प्रमाणे एका प्रकरणात मयत रुग्णाच्या नातेवाईकाने मयत रुग्णाच्या मृतदेहास अग्निडाग देण्यास नकार दिल्यामुळे नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक आर. व्ही. बांगर यांनी सुध्दा संसर्गाची भिती न जुमानता कर्तव्य म्हणुन स्वत : अग्निडाग देण्याचे काम केले आहे.

येथे क्लिक करा- गंगाखेडचे वास्तूवैभव भग्नावस्थेकडे; पुरातन विभागाचे दुर्लक्ष

मयत रुग्णाच्या अंत्यविधीची प्रक्रिया पुर्ण करण्याकामी नगरपरिषदेकडुन संबधीत नातेवाईकाकडुन कोणत्याची प्रकारचे शुल्क न आकारता निशुल्क सर्व प्रक्रिया संपन्न करण्यात येते. त्यानूसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आजपर्यंत एकुण २७ मयत रुग्णांचे अंत्यविधी नगरपरिषदे मार्फत करण्यात आलेले आहे. याकरीता आजपर्यंत एकुण १५६ क्विटंल लाकुड, सात हजार ८०० गोऱ्या व १८० लिटर डिजेल तसेच सुरक्षात्मक साहित्यामध्ये १३० पीपीई किट व हँडग्लोज, २७० मास्क, २७ बॉडीकव्हर इत्यादी अत्यावश्यक साहित्य नगरपरिषदेने स्वत : च्या निधीमधून खर्च केलेला आहे. याद्वारे नगरपरिषदे मार्फत कोरोनाच्या आपतकालीन परिस्थितीमध्ये शहरवासीयांना विविध प्रकारच्या सेवा प्रकारच्या सेवापुरविण्याच्या कामासोबत अपरिहार्य वेळी मयत रुग्णांस अग्निडाग देण्याचे काम सुध्दा नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

त्यानुसार नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे व त्यांच्या पुढील कार्यास उत्तेजन देण्याच्या दृष्टीकोनातून सामाजिक बांधीलकी म्हणुन नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष, दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचे हस्ते स्वच्छता निरीक्षक आर. व्ही. बांगर व स्वच्छता कर्मचारी दिनेश वर्मा, माधव सुक्ते, अनिल गालफाडे, काशिनाथ लगड, नवनाथ ठोंबरे, चेतन भुजवणे, रवी गायकवाड , दिनकर शिंदे, आकाश आठवले यांचा आणि रिसाला बाजार येथील पंरपरागत अंत्यवीधी करणारे सुरेश येरावार यांचा सत्कार करुन त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अद्यावत वाफ घेण्याचे यंत्र देवुन सत्कार करण्यात आला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com