पाण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

औरंगाबाद : सिडको एन-4 भागात तब्बल नवव्या दिवशी तर एन-पाचमध्ये सहाव्या दिवशी नळाला पाणी न आल्याने नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टॅंकरचा पाणी पुरवठा बंद पाडल्याचा प्रकार शनिवारी (ता. 25) सकाळी घडला. यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाणी येणार नाही, तोपर्यंत जागचे हलणार नाही, असा पवित्रा या नगरसेवकांनी घेतला आहे. 

भीषण पाणी टंचाईमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शहरात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. काही भागात पाच-सात दिवसानंतर पाणी मिळते तर काही भागात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. संपूर्ण शहराला समान पाणी मिळावे, अशी नगरसेवकांची मागणी आहे. त्यानुसार संपूर्ण शहराला तीन दिवसाआड समान पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. दोन आठवडे उलटल्यानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. एन-चार भागात शनिवारी नवव्या दिवशी तर एन-पाच भागात सहाव्या दिवशी पाणी न आल्याने भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत व शिवाजी दांडगे यांनी एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, अशोक पद्मे यांनी धाव घेतली. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between citizens and Aurangabd Municipal corporation officers for water