esakal | जिंतूरमध्ये दोन गटात हाणामारी; सहाजण गंभीर, बुधवार रात्रीची घटना
sakal

बोलून बातमी शोधा

जिंतूर क्राईम न्यूज

जिंतूरमध्ये दोन गटात हाणामारी; सहाजण गंभीर, बुधवार रात्रीची घटना

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना बुधवारी (ता. नऊ) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास शहरात कसबापेठेतील मोठा मारुती मंदिर परिसरात घडली. दुसरे दिवशी दुपारपर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नसल्याचे समजले.

याबाबत सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार शहरातील कसबापेठेतील मोठा मारुती मंदिर परिसरात किरकोळ कारणावरुन दोन गटात लाठ्याकाठ्यांनी जबर हाणामारी झाली. यामध्ये शेख हुसेन, अल्लाबख्श कुरेशी (वय ३०), शेख अमीन अल्लाबख्श कुरेशी (वय २७), शेख अल्लाबख्श हुसेन कुरेशी (वय६५), आसिफ करीम कुरेशी (वय२८), अरिफ करीम कुरेशी (१९ वर्षे) व अन्य एकजण गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील ग्रामीण रुग्णालयातील प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. लोकांमध्ये जागृती केली. परंतु त्यांचा विचार नांदेड बाजार समितीपर्यंत अद्यापही पोहोचला नाही.

ग्रामीण रुग्णालयात जमाव जमल्याने बाचाबाची होऊन तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असता ऐनवेळी पोलिस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाल्याने प्रकरण आटोक्यात आले. याप्रकरणी घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. वृत्त लिहिपर्यंत पोलिसात घटनेची नोंद झालेली नव्हती.

संपादन- प्रल्हाद कांबळे