
निलंगा (जि.लातूर) : चांगले उत्पन्न असूनही आईसाठी मंजूर झालेली पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करा असा आदेश निलंग्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये असा गुन्हा दाखल होणे पहिलीच बाब असल्यामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना यामुळेच चपराक बसणार आहे.
याबाबतची माहिती अशी की, सध्या शिरूर अनंतपाळ येथे राहत असलेल्या शालुबाई गुरुलिंगाप्पा येरोळे यांनी माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायद्याअंतर्गत मुलगा सूर्यकांत गुरलिंगप्पा येरोळे (रा.बाकली, ता. शिरूर अनंतपाळ) हा सांभाळ करीत नसल्यामुळे पोटगी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे अर्ज सादर केला होता. या प्रकरणी सुनावणी होऊन ता.५ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलगा सूर्यकांत यास आईस आईच्या अन्न, वस्त्र, निवारा व औषध उपचारासाठी त्यांना दरमहा दरमहा नऊ हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून देण्याचे आदेश दिले होते.
मात्र मुलाकडून उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी पोटगीसाठी दिलेली रक्कम देत नव्हता. याबाबत वारंवार सांगूनही मुलाकडून या आदेशाची अंमलबजावणी करीत नाही. मुलाकडून मंजूर झालेली पोटगी मिळत नसल्याची तक्रार आईने परत या कार्यालयात दाखल केली होती. याबाबतची गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी मुलगा सूर्यकांत यांच्यावर माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण याबाबतचा अधिनियम २००७ चे कलम २४ व भारतीय दंड संहिताचे कलम १८८ प्रमाणे मुलगा सुर्यकांत साकोळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिरूअनंतपाळ यांना दिला आहे. त्यामुळे माता-पित्याचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. यापुढे आई-वडिलांचा सांभाळ नाही केल्यास अशा मुलांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.