Polytechnic Admissions :‘पॉलिटेक्निक’साठी करा अर्ज नोंदणी; आज अखेरची संधी, आतापर्यंत २८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
Marathwada Education : मराठवाड्यातील ६४ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये १७ हजार ४२५ जागांसाठी आज अर्ज नोंदणीची अंतिम मुदत आहे. आतापर्यंत २८ हजार ७४० विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली असून, त्यापैकी २१ हजार २८१ अर्जांची निश्चिती झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ६४ पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये १७ हजार ४२५ जागा असून गुरुवारी (ता. २६) प्रवेश अर्ज नोंदणीची अखेरची मुदत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत २८ हजार ७४० विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली.