उदगीर, (जि. लातुर) - तालुक्यातील मौजे बोरगाव बुद्रुक, धडकनाळ, टाकळी या गावांत रविवारी (ता. १७) पुराचे पाणी शिरले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात फक्त अतिवृष्टीचा फटका बसून पूर आलेले एकमेव हे गाव असताना सुद्धा लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या तब्बल तीन दिवसांनी पूरग्रस्त गावाला भेट दिली. यावरून या सीमा भागातील शेतकऱ्यांविषयीची प्रशासनाची आस्था दिसून येत असल्याची चर्चा पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यात सुरू आहे.