cotton
sakal
गेवराई - यंदाचा खरिप हंगाम प्रारंभीपासून नैसर्गिक संकटात सापडला आहे. यात प्रामुख्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले असून, आधीच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीने कपाशी उत्पन्न निम्म्यावर आले असतानाच, आता अवकाळीने मुक्काम वाढविल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झालेल्या आहे.यामुळे गेवराईतील शेतक-यांचे चेहरे काळवंडून गेले आहेत.