राजेश टोपेंबद्दल अपशब्द वापरल्याने बबनराव लोणीकरांविरोधात FIR दाखल | Babanrao Lonikar Comment On Rajesh Tope | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh-Tope
राजेश टोपेंबद्दल अपशब्द वापरल्याने बबनराव लोणीकरांविरोधात FIR दाखल

राजेश टोपेंबद्दल अपशब्द वापरल्याने बबनराव लोणीकरांविरोधात FIR दाखल

जालना : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरल्याबद्दल भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्याविरुद्ध तक्रार (एफआयआर) दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी (ता.२१) सांगितले, की राष्ट्रवादीचे शिवप्रसाद चांगले यांनी लोणीकरांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी (ता.१८) लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले होते. यावेळी विकास निधीचे असमान वितरण होत असल्याचा (Jalna) आरोप लोणीकर यांनी केला होता. ते पुढे म्हणाले, की त्यांच्या परतूर मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात आली नाही. राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक नेत्यांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात लोणीकरांविरोधात तक्रारी दाखल्या केले आहेत.

हेही वाचा: मोदी अन् योगी...डबल इंजिनचे सरकार, संबित पात्रांची प्रतिक्रिया

लोणीकर काय बोलले?

टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर, असे अपशब्द भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपेंबद्दल वापरले होते.

loading image
go to top