A fire broke out on the floor of the accident department of Parbhani District Hospital on Saturday night
A fire broke out on the floor of the accident department of Parbhani District Hospital on Saturday night

परभणी जिल्हा रुग्णालयातील खाटपसाऱ्यांच्या खोलीला आग

Published on

परभणी : जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाच्या वरील मजल्यावर शनिवारी (ता.सहा) रात्री उशिरा आग लागली. या आगीत या ठिकाणी ठेवलेले साहित्य जळून खाक झाले. या घटनेची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती गठीत केली आहे.

काही दिवसापूर्वी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आग लागल्याची घटना ताजी असतानाच परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाच्या वर असलेल्या एका खोलीतील साहित्याला आग लागल्याची घटना शनिवारी (ता.सात) रात्री उशिरा घडली. अपघात विभागाच्यावरील मजल्यावर ठेवलेल्या लाकडी साहित्यास शनिवारी (ता.सहा) रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे दवाखान्यात गोंधळ उडाला. आग लागल्याचे समजताच दवाखान्यात धावपळ देखील झाली. परिणामी रुग्णांचे हाल झाल्याचे पहावयास मिळाले. 

रुग्णालयात आग लागल्याची बातमी समजताच आजू बाजूच्या परिसरातील नागरिक रात्री धावत रुग्णालयाकडे आले. तातडीने आग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अर्धा पाऊण तास ही आग विझविण्याचे प्रयत्न झाले. ज्या खोलीमध्ये आग लागली त्या खोलीत लाकडी साहित्य ठेवलेले होते. त्यामुळे आग वाढत होती. परंतु वेळीच अग्निशमन दलाच्या जवांनानी ही आग आटोक्यात आणली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास सुरवसे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग पूर्ण विझेपर्यंत रुग्णालयातील अधिकारी रुग्णलयात ठाण मांडून बसले होते.

आगीच्या घटनेची होणार चौकशी

जिल्हा रुग्णालयात अनपेक्षित लागलेल्या या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके, महापालिकेचे उपायुक्त श्री.गायकवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांचा समावेश आहे. आगीच्या घटनेच्या कारणांची चौकशी करून तीन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com