कोरोना केअर सेंटरच्या खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या तीन मजली इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे.  इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन एका खोलीतील विद्युत बोर्डाला आग लागली. 

कळमनुरी (जि. हिंगोली): येथील कोरोना केअर सेंटरमधील एका खोलीतील विद्युत बोर्डाला रविवारी (ता. ३१) शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. घटनास्‍थळी अग्निशमन दलाला पाचारण करीत वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ही आग आटोक्‍यात आली.

शहरातील इंदिरानगर भागातील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या तीन मजली इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना आजाराचा संसर्ग झालेले रुग्ण व त्यांच्या संपर्कातील १४ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा - कळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी 

खोलीतील विद्युत बोर्डाला आग

आरोग्य विभाग, पालिका कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन एका खोलीतील विद्युत बोर्डाला आग लागली. या खोलीतून धूर बाहेर येत असल्याने उपचार घेत असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केला. 

मोठी हानी झाली नसली तरी  धावपळ झाली. 

तातडीने ही माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. याच वेळी विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे त्र्यंबक जाधव तेथे वाहन घेऊन दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आग विझविली. मोठी हानी झाली नसली तरी यामुळे मोठी धावपळ झाली. 

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न

दरम्यान, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, पोलिस कर्मचारी गणेश सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, कैलास जाधव, पालिका कर्मचारी गंगाधर वाघ, सुभाष काळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी तातडीने इमारतीचा बंद झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न हाती घेतले.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस 

वसमत येथे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

वसमत : दोन माहिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचारी योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या अनुषंगाने येथे पोलिस कर्मचाऱ्यांची रविवारी (ता.३१) आरोग्य तपासणी खासगी डॉक्टरांनी केली. तसेच पोलिस बांधवांना आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख यांच्या पुढाकारातून पोलिस बांधवांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

या शिबिरामध्ये डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एम. आर. क्यातमवार, सचिव डॉ. निलेश डिग्रसे, डॉ. गंगाधर काळे, डॉ. माणिक मसारे, शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉ. बाळासाहेब सेलूकर, डॉ. सनाउल्ला पठाण, डॉ. सागर सातपुते, डॉ. महेश रावतोळे, डॉ. चेतन सातपुते, डॉ. राजेंद्र पाटील जवळेकर, डॉ. कदम, डॉ. अडकिणे, डॉ. हेमंत जेस्वानी, छाया अडकिणे आदींची उपस्‍थिती होती. 

कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश

सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी आदिनाथ क्लिनिकल लॅबचे संचालक प्रणील कंधारकर, बालाजी लॅब, ललिता मज्जनवार, शैलेश मज्जनवार, आशोक मज्जनवार, आरोग्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप वरवंटे आदींनी पुढाकार घेतला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Fire Caused By A Short Circuit In The Room Of The Corona Care Center Hingoli News