परभणीत डम्पिंग ग्राऊंडला आग ; चार तासानंतर आटोक्यात 

aag
aag

परभणी : महापालिकेच्या धार रोडवरील डम्पिंग ग्राऊंडला शुक्रवारी (ता.३०) दुपारी लागलेली आग चार तासांनंतर आटोक्यात आली. यादरम्यान धुराचे लोळ मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्यामुळे परिसर काळोखून गेला होता. 

शहरातील या डम्पिंग ग्राऊंडवर दररोज शेकडो टन कचरा टाकला जातो. तेथे कचऱ्याचे ढिगारे झाले आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी महापालिकेस कळवली. अग्निशमन प्रमुख दीपक कान्होडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पथक घटनास्थळी पोचले. अग्निशमन यंत्रणेच्या तीन गाड्यांच्या साहाय्याने चार तासांत आग आटोक्यात आणली. 

भरधाव दुचाकीची बैलगाडीला धडक, एकजण गंभीर जखमी
देवगावफाटा : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबाद-नांदेड महामार्गावरील देवगावफाटा जवळील महामार्ग पोलिस चौकीजवळ शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील अमोल मुक्तीराम मोरे (वय २२) हा शेतकरी युवक शुक्रवारी रात्री शेतातून आपली बैलगाडी घेऊन घराकडे येत घरी होता. ही बैलगाडी महामार्ग पोलिस चौकीजवळ आली असता मंठ्याकडून पाठीमागूनच भरधाव वेगात येत असलेली (एमएच २२ एई ४६४०) क्रमांकाच्या दुचाकीने समोरील बैलगाडीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचीवरील आसाराम राठोड ( वय ४५ रा. चिकलठाणा ता.सेलू) हे गंभीर जखमी झाले तर बैलगाडी चालवणारा देवगावफाटा येथील अमोल मोरे हा शेतकरी युवक किरकोर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती चारठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी श्री.गरूड यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाला (मंठा जि.जालना) येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात लाकडी बैलगाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.  

वीज उपकेंद्रात कंत्राटी कामगार शॉक लागून जखमी
देवगावफाटा : सेलू तालूक्यातील देवगांवफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात अंतर्गत काम करणारा कंत्राटी कामगार विजेचा शॉक लागुन गंभीर जखमी झाला. उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रात एका एजन्सीमार्फत उपकेंद्रात अंतर्गत दुरूस्तीचे काम काही कंत्राटी कर्मचारी करीत होते. त्यापैकी एकास शुक्रवारी विजेचा शॉक लागल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम उपचारासाठी मंठा येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, त्यानंतर परभणी येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली; मात्र त्या कामगाराचे नाव सांगण्यास महावितरणकडून टाळाटाळ केली गेली. उपकेंद्रात ऑपरेटर जिवन मुगळीकर हे असताना हा प्रकार घडला. त्यांनी काम करणेपुर्वी सर्व वीजपुरवठा खंडीत का केला नाही असा प्रश्न आहे. मुगळीकर हे त्या जखमी कामगारासोबत असून त्यांचा मोबाइल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तर कनिष्ठ अभियंता कोतवाल यांचाही मोबाईल बंद येत होता. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता एम.एस.आरगडे यांना विचारणा केली असता असा प्रकार झाला नाही असे म्हणत त्यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली.

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com