कळमनुरीत दुकानाला आग, लाखोंची नुकसान  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

आग लागून नुकसान झालेल्या दुकानाची पाहणी आमदार 
संतोष बांगर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी केली.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : येथील चौक बाजारात असलेल्या एका किराणा दुकानाला शुक्रवार (ता.1) मध्यरात्रीला आग लागून जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अग्निशमन दल व आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ करीत आग आटोक्यात आणल्यामुळे संभाव्य मोठे नुकसान झाले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील चौक बाजारात दिलीप सावजी यांचे अंकित किराणा दुकान आहे. या दुकानाला शुक्रवार मध्यरात्री आग लागली ही घटना आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने आग विझवण्याला प्राधान्य देत या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचासिडको परिसरातून एक लाखाची दारु जप्त- एलसीबीची कारवाई

नागरिकांनी जमेल तसे केले प्रयत्न

अग्निशमन दलाचे त्र्यंबक जाधव, तुषार साखळे, संतोष सारडा, उदय लाला, शिकू मांडवगडे, विशाल साकळे, सागर साकळे, रुपेश सोनी, करण वर्मा, अजय वर्मा, लखन वर्मा, भैया दरक, राज मोडक, प्रेम साकळेसह नागरिकांनी जमेल त्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

आगीमध्ये जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान

त्यानंतर काही वेळाने दुकानाला लागलेली आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले या आगीमुळे बाजूला असलेल्या संगम टेलर या दुकानांमधील कपड्यांचे ही मोठे नुकसान झाले किराणा दुकानाला लागलेल्या आगीमध्ये जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस व महसूल प्रशासनाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी केली पाहणी

शनिवार (ता.2) आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, नगरसेवक संतोष सारडा, अप्पाराव शिंदे, राजू संगेकर, दादाराव डुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालक दिलीप सावजी यांच्याशी चर्चा करून झालेल्या नुकसान संदर्भात पाहणी करीत माहिती घेतली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in Kalamanuri shop, loss of lakhs hingoli news