esakal | बीड जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, नगरच्या तबलिगींशी संपर्क
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

आता सापडलेला हा रुग्ण आष्टी तालुक्यातील असून तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या नगर जिल्ह्यातील काहींच्या तो संपर्कात होता. मागील 24 मार्चपासून अहमदनगर येथील भिंगार भागातील मशिदीत त्याने काही काळ वास्तव्य केल्याची माहिती आहे. ता. दोन एप्रिलला तो जिल्ह्यात आला.

बीड जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला, नगरच्या तबलिगींशी संपर्क

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : उपाय योजनांची पराकाष्ठा करत आतापर्यंत कोरोनाला वेशीतच अडविणाऱ्या बीड जिल्ह्यात अखेर बुधवारी (ता. आठ) पहिला कोरोना रुग्ण आढळला. आतापर्यंत 100 जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून, 98 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, एक अहवाल येणे बाकी आहे.

आता सापडलेला हा रुग्ण आष्टी तालुक्यातील असून तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या नगर जिल्ह्यातील काहींच्या तो संपर्कात होता. मागील 24 मार्चपासून अहमदनगर येथील भिंगार भागातील मशिदीत त्याने काही काळ वास्तव्य केल्याची माहिती आहे. ता. दोन एप्रिलला तो जिल्ह्यात आला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना विषाणू रोखण्यासाठी उपाय योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने राज्यसमोर दिशादर्शक पॅटर्न उभा केला. दरम्यान, पुणे येथे आढळलेल्या कोरोना रुग्णांसोबत विमान प्रवास करणाऱ्या तिघांसह तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या आणि कोरोना विषाणूची लागण झालेल्या 8 जणांच्या संपर्कात आलेल्या 28 पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर चार कर्मचाऱ्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले होते. 

परंतु, नगर जिल्ह्यातील तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आलेल्या या व्यक्तीलादेखील कोरोनाची लागण झल्याचे स्पष्ट झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.