ओव्हरफ्लोमुळे मत्स्यबीज जातेय वाहून, मत्स्य व्यावसायिक चिंतातूर !

संजय राऊत
Thursday, 24 September 2020


जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी शिवारातील मत्स्य व्यावसायिक चिंतातूर - जाळ्या लावल्या पण पावसाचा जोर सुरुच, 

टेंभुर्णी (जालना) : जाफराबाद तालुक्यात असलेल्या अकोला देव मध्यम प्रकल्पामध्ये येथील दयानंद बाबा मच्छीमार संस्थेच्या वतीने मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. यंदा पाऊस मुबलक असल्याने धरण कायम ओव्हर फ्लो आहे. सद्य स्थितीतही धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. परिणामी यामध्ये तयार झालेली मत्स्यबीज सांडपाण्यामध्ये वाहून जात आहे. त्यामुळे मच्छीमार संस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वाहून जाणारे मासे तलाव आतच रोखले जावे म्हणून मच्छीमार संस्थेकडून तलावांच्या सांडव्यावरून जाळी लावावी लागत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अकोला देव येथील जीवन जीव रेखा मध्यम प्रकल्प या परिसरातील सर्वात मोठा प्रकल्प असून या ठिकाणी मत्स्य व्यवसायाला मोठी चालना आहे. या तलावात मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायांकडून पहिली पसंती दिली जाते. गेल्या वर्षापासून दयानंद बाबा मच्छीमार संस्थेच्या वतीने या तलावाचा ठेका घेण्यात आला. या तलावात मत्स्यबीज सोडले जाते याही वर्षी लाखो रुपयाचे मत्स्यबीज अकोला देव मध्यम प्रकल्प सह इतर तलावात मच्छी व्यवसायिकांनी मत्स्यबीज सोडले आहेत. परंतु यंदा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली. याने सर्व धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. मध्यम प्रकल्पासह लहान-मोठे तलाव ओसंडून वाहत असल्याने मासे नदी नाल्यात वाहून जात आहे.  यामुळे खवय्यांची जिभेचे चोचले पुरवले जात असले तरी मत्स्य व्यवसायाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या समस्येमुळे मासेमारी व्यावसायिकांनी महागडे जाळे आणून सांडव्याच्या समोर लावण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी अतिरिक्त हा खर्च यावर्षी मत्स्य व्यावसायिकांना करावा लागत असल्याचे दयानंद बाबा मच्छी व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष राजीव करवंदे यांनी सांगितले. काही तलावाच्या सांडव्यावर लावलेल्या जाळ्यात पावसाच्या जोरदार आगमनामुळे त्या जाळ्या वाहून गेल्या आहेत. यामुळे मोठ्या धरणातील मत्स्यबीज वाहून गेल्याचे राजू करवंदे यांनी सांगितले. मंगळवारी परिसरात झालेल्या पावसामुळे पुन्हा नदी-नाले खळखळून वाहिले यामुळे मोठे नुकसान झाले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सुपरनस कतला ला मागणी 
सद्यस्थितीत अधिक मास सुरू झाला असून अधिक मासाचा पर्व काळात अनेक जण मांसाहार टाळतात. परंतु यंदा कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर माशांना मोठी मागणी आहे. सुपरनस कतला या जातीच्या माशांना मोठी मागणी असते. दरम्यान येथूनच जवळ कुंभारझरी परिसरात खडकपूर्णा प्रकल्पातूनही मोठमोठे मासे विक्रीसाठी येत असल्याने खवय्यांची मासे खाण्याची हौस पूर्ण होत आहे. दरम्यान लहान-मोठ्या ओढे नाल्यांना नदीत ही मासे पकडणारा यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे चोहीकडे पाणीच पाणी असल्याने माशांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish seeds are carried due to overflow