esakal | पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime-logo.jpg

-  पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी  माहेरावरून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. 

- धायरी (जि.पुणे) येथील पाच जणांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२३) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. 

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी  माहेरावरून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. धायरी (जि.पुणे) येथील पाच जणांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२३) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हयातील धायरी येथील शिला स्वप्नील जाधव या विवाहितेचा सासरची मंडळी छळ करीत 
होती. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांचा छळ  केला जाऊ लागला. शिला जाधव पैसे आणत नसल्याचे लक्षात येताच सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे त्या माहेरी रामेश्वरतांडा (ता.कळमनुरी,जि. हिंगोली) येथे राहण्यासाठी आल्या. 

दरम्यान, सासरकडून होणारा छळ असह्य झाल्याने शिला जाधव यांनी शुक्रवारी (ता.२३) रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी स्वप्नील जाधव, पंडीत जाधव, बालिका जाधव (रा. धायरी, जि. पुणे), साहेबराव प्रकाश राठोड आणि अन्य एक जण (रा. शिरला 
ता. औंढा नागनाथ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस 
निरीक्षक गणेश राहिरे, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत 
आहेत.

loading image
go to top