परभणीत पाच मृत्यू, ३५ पॉझिटिव्ह  

corona
corona

परभणी ः जिल्ह्यात उपचारादरम्यान आज पाच जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ३५ नवे कोरोनाबाधित आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. रुग्णसंख्या पाच हजार १७८ झाली असून चार हजार ३१३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

परभणी शहर महापालिकेच्यावतीने रविवारी (ता.२७) शहरातील पाच केंद्र, तीन खासगी रुग्णालयांत व प्रभाग समिती ‘क’ तर्फे ९३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ८९ निगेटिव्ह तर चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. 

५७ ऑटोरिक्षाचालकांची तपासणी
सिटी क्लब येथे एका व्यक्तीची, आयएमए हॉल येथे १२ जणांची तपासणी करण्यात आली. जागृती मंगल कार्यालयात १९ जणांची तपासणी केली असता चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. शहरातील बसस्थानक परिसरात ५७ ऑटोरिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. शहरातील तीन खासगी रुग्णालयात तीन जणांची तपासणी करण्यात आली. शहरातील सर्व नागरिक, ऑटोरिक्षाचालक यांनी रॅपिड टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले. 
 
हेही वाचा - कोरोनाने मृत झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरसेवकाचा असाही पुढाकार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यावर भर पावसात अंत्यसंस्कार 
जिंतूर ः तालुक्यातील चारठाणा येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी जिंतूर येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी भर पावसात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. ही घटना शनिवारी (ता.२६) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. चारठाणा येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीला श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना चारच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत भरपावसात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस यांच्या उपस्थितीत शेख मंजूर दारोगा तसेच कामगार दशरथ मोहिते, कैलास उपाडे, नामदेव कांबळे, काशीनाथ मोहिते या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. 

परभणी जिल्हा
एकूण बाधित ः पाच हजार १७८
आजचे बाधित रुग्ण ः ३५
आजचे मृत्यु ः पाच 
एकूण बरे रुग्ण ः चार हजार ३१३
उपचार घेणारे रुग्ण ः ६४४
एकूण मृत्यु ः २२१

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com